WWE ‘रेसलर’ जॉन सीनानं इरफान खानला दिली ‘श्रद्धांजली’ ! शेअर केला ‘लाईफ ऑफ पाय’मधील फोटो

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार इरफान खाननं बुधवारी (दि. 29) जगाचा निरोप घेतला. 53 वर्षीय अभिनेता दीर्घकाळापासून कॅन्सरसोबत लढा देत होता. त्याला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आयसीयुत त्याच्यावर उपचार सुरू होते. 2018 साली इरफान खानला आपल्या मेंदूत न्यूरोएंडोक्राईन ट्युमर असल्याचं समजलं होतं. यावर त्यावर त्यानं उपचारही घेतले होते. त्याच्या निधनानंतर जगभर शोक व्यक्त करण्यात आला. यानंतर आता WWE रेसलर जॉन सीना यानंही इरफान खानचा फोटो शेअर करत श्रद्धांजली दिली आहे.

जॉन सीनानं त्याच्या इंस्टावरून इरफान खानचा लाईफ ऑफ पायमधील एक फोटो शेअर केला आहे. जॉन सीनानं फोटो शेअर केल्यानंतर लगेचच तो व्हायरल होताना दिसला. यावर अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. काहींनी म्हटलं आहे की, इरफान खानला विसरणं शक्यच नाहीये. या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. सीनानं आधी ऋषी कपूर यांचाही फोटोही शेअर केला होता.

इरफान खानचा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी जॉन सीनाला धन्यवाद दिले आहेत आणि त्याचं कौतुकही केलं आहे. एकानं म्हटलं की, तू भारतीय लोकांनी पर्वा करतोस. लव्ह यु सीना. सध्या जॉननं शेअर केलेल्या फोटोची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे.