Xiaomi नं भारतात लॉन्च केला ‘इलेक्ट्रिक’ टूथब्रश, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चिनी टेक कंपनी शाओमी (Xiaomi) काही काळापासून भारतात आपले स्मार्ट होम इकोसिस्टमचे प्रॉडक्ट्स भारतात लाँच करत आहे. कंपनीने भारतात Mi Electric Toothbrush T300 लाँच केला आहे. त्याची किंमत 1,299 रुपये ठेवण्यात आली आहे.

शाओमीने यास Mi Crowdfunding अंतर्गत सादर केले आहे. म्हणजेच जर कंपनीला 1000 टूथब्रशसाठी निधी मिळत असेल तरच आपण ते विकत घेऊ शकता. यासाठी वितरण 10 मार्चपासून सुरू होणार आहे. शाओमीने दावा केला आहे की Mi Electric Toothbrush T300 ची बॅटरी बॅकअप 25 दिवसांची असणार आहे.

यास व्हाइट कलर व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले गेले आहे आणि IPX7 वॉटर रेझिस्टंट आहे. कंपनीने म्हटले आहे की यात देण्यात आलेल्या प्लास्टिक ब्रश हेडला स्टोअर करण्यास सोपे होईल. या इलेक्ट्रिक टूथब्रश मध्ये DuPont TyneX StaClean ब्रिस्टल्स देण्यात आली आहेत आणि दावा करण्यात आला आहे की हा दातांची सफाई अधिक चांगल्या पद्धतीनं केली जाईल.

या इलेक्ट्रिक टूथब्रश मध्ये मॅग्नेटिक लेव्हिटेशन सोनिक मोटरचा वापर करण्यात आला आहे जो 1 मिनिटात 31000 वेळा व्हायब्रेशन करतो. कंपनीने सांगितले आहे की दात स्वच्छ करण्यासाठी हे पुरेसे आहे. यात तुम्हाला ड्युअल प्रो ब्रश आणि इक्वी क्लीन ऑटो टाइमर असे दोन वेगवेगळे मोड मिळतील.

शाओमीच्या या इलेक्ट्रिक टूथब्रशला आपण चार्ज करू शकता. यासाठी आपल्याला यूएसबी टाइप सी चार्जरची आवश्यकता असेल जे 5W आउटपुट देईल. म्हणजेच आपण सामान्य स्मार्टफोन चार्जरने देखील यास चार्जिंग करू शकतात. कंपनीने असा दावा केला आहे की आपण एक ब्रश हेड हे सतत चार महिने वापरू शकता. यासह कंपनी एक वर्षाची वॉरंटीही देत आहे.