Yogesh Kadam Accident Case | ‘माझ्या मुलाला गाडीसह दरीत ढकलण्याचा कट होता’, रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे सुपुत्र आणि शिंदे गटाचे आमदार (Shinde Group MLA) योगेश कदम यांचा शुक्रवारी (दि.6) रात्री अपघात (Yogesh Kadam Accident Case) झाला. मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) पोलादपूर जवळ असलेल्या कशेडी घाटात योगेश कदम यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातात (Yogesh Kadam Accident Case) योगेश कदम यांच्या कारचे चालक आणि तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल करुन तपास सुरु केला आहे.

योगेश कदम यांच्या कार अपघाताचा तपास सुरु असताना रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. योगेश यांचा अपघात घडवून त्यांना गाडीसह दरीत ढकलण्याचा कट होता, असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे. अपघातानंतर सुदैवाने योगेश यांची गाडी पोलिसांच्या गाडीला धडकली. त्यामुळे हा कट फसल्याचे कदम यांनी सांगितले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

रामदास कदम यांनी सांगितले. योगेश कदम यांच्या अपघात प्रकरणी (Yogesh Kadam Accident Case) पोलिसांकडून तपास सुरु असून चालकाला अटक (Arrest) केली आहे. चालकाने पोलिसांना दिलेल्या जबाबात गाडीचा ब्रेक फेल (Brake Fail) झाल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात गाडीचे ब्रेक फेल झाला नव्हता हे तपासात समोर आले आहे. चालक खोटं बोलत आहे. पुढे आणि मागे पोलिसांच्या गाड्या असताना योगश यांच्या मधल्या गाडीला दीडशे फूटापर्यंत रेटत नेलं. योगेश यांची गाडी आणखी थोडी पुढं गेली असती तर दरीत कोसळली असती. असाच प्लॅन होता, असं मला वाटतं, असे रामदास कदम म्हणाले.

आमचं नशीब चांगलं होतं, लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्याने माझा मुलगा बचावला.
परंतु तो चालक खोट बोलत असल्याचे सिद्ध झाले आहे.
पोलिसांनी दोन ठिकाणी पथकं पाठवली असून चालकाचे आजपर्यंतचे रेकॉर्ड तपासले जात असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली.

Web Title :- Yogesh Kadam Accident Case | ramdas kadam reaction on mla yogesh kadam accident kashedi ghaat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kirit Somaiya | हसन मुश्रीफ यांच्यावर ED च्या छापेमारीबाबत बोलले किरीट सोमय्या; म्हणाले…

Hasan Mushrif ED Raid | ईडीच्या छापेमारीनंतर पहिल्यांदाच बोलले हसन मुश्रीफ; म्हणाले…

Nashik Police Car Accident | मुंबई-आग्रा महामार्गावर पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात, तीन पोलीस कर्मचारी जखमी