भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना ‘कोरोना’ची लागण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना संसर्गाची लागणं झाल्याचं चाचणी अहवालात स्पष्ट झाले होते. दरम्यान, आता आणखी एका भाजपाच्या नेत्याला या संसर्गाने विळखा घातला आहे. माजी आमदार योगेश टिळेकर यांना देखील कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. टिळेकर यांनी स्वतः ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली आहे.

ताप व कणकण जाणवल्याने दोन दिवसांपूर्वी माझी व मुलाची कोविड-१९ चाचणी केली असतां चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. माझी प्रकृती स्थिर असून, तुमच्या आशिर्वादामुळे लवकर बरा होऊन येईल. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे, असे ट्विट त्यांनी केलं. तर काल भाजप प्रदेश ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष पदी योगेश टिळेकर यांची निवड झाली आहे.

पुण्याचे महापौर रुग्णालयात दाखल
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोरोना संसर्ग चाचणी अहवाल काल पॉझिटिव्ह आला. थोडासा ताप जाणवल्याने त्यांनी तपासणी केली असता चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच आपली प्रकृती उत्तम व स्थिर असल्याचा निर्वाळा दिला आहे. यातून लवकरच बरे होऊन पुणेकरांच्या सेवेसाठी हजर होईल, असा विश्वास त्यांनी वक्त केला आहे.

पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार सुरु झाल्यापासून मोहोळ हे सातत्याने आघाडीवर राहून काम करत आहेत. बैठका, रुग्णालयांना भेटी, दौरे यात ते व्यस्त असायचे. उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सुद्धा त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. दरम्यान, महापौरांनाच कोरोना संसर्गाची बाधा झाल्याने पुण्याची यंत्रणा पुन्हा सतर्क झाली आहे. मोहोळ यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे,