मतदान कार्ड नसेल तर घाबरू नका.. ‘या’ कागदपत्रांच्या साह्याने आपण मतदान करू शकता…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ही येणाऱ्या 21 तारखेला होणार असुन मतदाराला मतदान करतेवेळी मतदान कार्ड सोबत ठेवणे आवश्यक असते. ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड नसेल त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. अशावेळी तुम्ही इतर ओळखपत्राच्या मदतीनेसुध्दा आपला मतदानाचा हक्क बजाऊ शकता.  त्या ओळखपत्रांची यादी खालील प्रमाणे.

1. पासपोर्ट. (पारपत्र)

2. वाहन चालक परवाना.

3. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र. (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे आयकार्ड)

4. छायाचित्र असलेले बँकांचे/ टपाल कार्यालयाचे पासबुक.

5. पॅनकार्ड.

6. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड.

7.  मनरेगा जॉबकार्ड.

8.  कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड.

9. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज.

10. खासदार/ आमदार/ विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र.

11. आधारकार्ड.