मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडूलकर याची मुलगी सारा तेंडुलकर दिसायला खुपच सुंदर आहे. सारा जरी ग्लॅमरपासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या मैदानावर मात्र तिचा दबदबा कायम आहे. तिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडची अभिनेत्री देखील फिकी आहे. तिचे सुंदर फोटो तुम्ही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाहू शकता.
सारा बॉलिवूड किंवा लाइमलाइटपासून नेहमीच दूर राहते. मात्र जेव्हा तिच्या सौंदर्याची गोष्ट येते तेव्हा ती बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही टक्कर देते. ग्लॅमरपासून दूर राहणारी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिचा सोशल मीडियावर चाहता वर्ग खूप मोठा आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 6 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
सारा आपले सुंदर फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा फॅशन सेन्स सुद्धा एखाद्या अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. काही काळापासून बॉलिवूड पार्ट्यांमध्ये साराचा सहभाग पाहता ती अभिनय क्षेत्रात पदार्पण करले अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र यावर सचिन तेंडुलकर किंवा स्वतः साराने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
सध्या सारा लंडनमध्ये आपले शिक्षण पुर्ण करत आहे. जेव्हा सारा भारतात येते तेव्हा तिच्या लुकची चर्चा सोशल मीडियावर बरीच रंगते. अनेकदा साराला आपल्या आई-वडिलांसोबत अवॉर्ड फंक्शन किंवा पार्ट्यांमध्ये स्पॉट केले गेले आहे. सध्या सोशल मीडियावर साराच्या लुकची चर्चा प्रचंड सुरु आहे. त्यामुळे चाहत्यांना तिच्या बॉलिवूड पदार्पणाची उत्सुकता लागली आहे.
- ‘ब्लॅक कॉफी’ घेता ? वेळीच व्हा सावध ; रिसर्चमधील ‘हे’ 5 धक्कादायक खुलासे !
- सतत वजन कमी-जास्त होणे आरोग्यासाठी घातक ! जाणून घ्या 3 तथ्य
- थंडीत हृदयरोगाच्या रुग्णांनी ‘या’ 4 गोष्टींची घ्यावी खास काळजी !
- नारळ पाण्याने वेगाने वजन होईल कमी ! जाणून घ्या 11 फायदे
- ‘युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन’ झाल्यास ‘या’ 5 गोष्टींची घ्या काळजी !