ज्येष्ठ नगरसेवक स्व. दत्ता साने यांच्या कुटुंबियांचे युवा नेते पार्थ पवार यांनी केले सांत्वन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांनी आज पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक स्व. दत्ता साने यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव झाल्यामुळे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांचे दि. ४ जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साने कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहीत पवार यांनीही साने कुटुंबियांना आधार दिला.

दरम्यान, युवा नेते पार्थ पवार यांनी आज साने कुटुंबियांची भेट घेवून विचारपूस केली. संपूर्ण पवार कुटुंबिय आपल्या दु:खात सहभागी आहे, असा आधारही दिला. यावेळी राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे , विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like