धक्कादायक ! 2 आणि 4 वर्षाच्या मुली भुकेनं व्याकूळ होत्या, बापानं त्यांना थेट पाजली दारू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युक्रेनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे आपल्या 2 वर्षाच्या आणि 4 वर्षाच्या मुलीला भूक लागली असताना एका पित्याने दारू पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील दूध संपले असल्याने त्याने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,रस्त्यावर या मुली बेशुद्धावस्थेत आढळून आल्या असून या मुली अल्कोहल पॉइजनिंगच्या शिकार झाल्या आहेत. मुलींना भूक लागल्यानंतर त्यांनी वडिलांकडे जेवणाची मागणी केली होती. सध्या या मुलींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. याविषयी माहिती देताना डॉक्टरांनी सांगितले कि, मुलींची प्रकृती खूप नाजूक झाली होती. त्यामुळे त्यांना मृत्यूचा देखील धोका होता. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या आरोपी पित्याचे नाव मिकोला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मुलींची आई दुसऱ्या शहरात कामानिमित्त गेली असताना मुलींची जबाबदारी हि वडिलांकडे होती.दरम्यान, 3 ऑक्टोबर रोजी हि घटना घडली असून आता समोर आली आहे. मुलींना त्याने दुधाऐवजी दारू दिली त्यावेळी तो देखील दारूच्या नशेत होता. त्यामुळे शेजारच्यांनी या मुलींना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.

Visit : Policenama

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like