भांग पाडण्याच्या बहाण्याने येऊन गल्ल्यातून रोकड लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भांग पाडण्याच्या बहाण्याने हेअर सलूनमध्ये आलेल्या तरुणाने दुकानदाराला धमकावून गल्ल्यातून १ हजार ९०० रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार हडपसर येथे समोर आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

अस्लम शेख उर्फ (रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलामत शेख (वय ३०, रा. गंगानगर, फुरसुंगी ) याने या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलामत शेख याचे हडपसर भागातील सातववाडी परिसरात हेअर सलून आहे. दोन दिवसांपूर्वी या भागातील रहिवासी अस्लम शेख याच्या केशकर्तनालयात आला. तो भांग पाडण्याचा बहाणा करत सलूनमध्ये आला. त्यानंतर त्याने  शेख यांना धमकावून गल्ल्यातील १९०० रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.

ह्याहि बातम्या वाचा

SBI ची मोठी ऑफर ; ‘या’ ग्राहकांना मिळणार दुप्पट व्याज

मुंबईतील 500 चौरस फुटांची घरं मालमत्ता करमुक्त : शिवसेनेची वचनपुर्ती !

एअर स्ट्राइकचे ‘सत्य’ लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड

नागपूरबरोबर पुण्याची मेट्रो सुरू झाली नाही सत्ताधाऱ्यांचे हे अपयशच : माजी आमदार मोहन जोशी

Loading...
You might also like