छातीत गोळी झाडून ‘आयटी’तील एकाची आत्महत्या

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – दोन दिवसांपूर्वी नोकरी सोडलेल्या उच्चशिक्षित तरुणाने पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथ घडली आहे.

सचिन शिवाजी वांडेकर (२८, रा. पिंपळे गुरव, मूळ-आष्टी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सचिन, लहान भाऊ दीपक शिवाजी वांडेकर आणि विशाल अशोक लहाने हे तिघे जण एकत्र रुम करून राहत होते. रविवारी सायंकाळी सचिनने पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यावेळी बाथरूममध्ये असणारा विशाल आणि लहान भाऊ दीपक धावत आले. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात सचिन पडलेला दिसला. सचिनला रुग्णालयात नेले मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पुण्याच्या विमान नगर येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या सचिनकडे पिस्तुल आले कोठून याचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –