Mai Bhi Harjeet Singh : ड्यूटीवर असताना हात गमावलेल्या धाडसी पोलिसाला सिक्सर किंग युवराजचा कडक ‘सॅल्यूट’

पंजाब, पोलिसनामा ऑनलाईन- कोरोनामुळे देशात लॉकडाऊनची परिस्थिती असताना. काही माथेफिरू मात्र कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिसांवर, नियमांची पायमल्ली करून खुशाल हात उचलताना दिसत आहेत. पंजाब मध्ये देखील लॉकडाऊन मध्ये नियमांची पायमल्ली करणाऱ्या माथेफिरूंना हटकल्याने पोलिसांवर या माथेफिरूंनी हल्ला केला या हल्यात पोलीस हरजीत सिंग यांना आपला हात गमवावा लागला सध्या हरजीत सिंग यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पटियाला येथे नाकाबंदीचे काम असताना पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्यात अनेक पोलीस जखमी झाले होते.

या हल्ल्यानंतर पंजाब मधील अनेक सेलिब्रीटी हार्जित सिंग यांच्या सोबत आपण उभे असल्याचं सांगत ” में भी हरजीत सिंग ” हि चळवळ सुरु केली आहे. नुकतेच युवराज सिंग याने हार्जित सिंग यांना सॅल्यूट करण्यासाठी हातात “में भी हरजीत सिंग” चा फलक घेऊन आपण हरजित सिंग यांच्या सोबत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तसेच युवराज सिंग यांनी हरजीत सिंग यांचे धाडस आणि दृढनिश्चय अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहे तसेच आम्ही सर्व जण हार्जित सिंग यांच्यासोबत असल्याचे ट्विट केले आहे. तसेच हार्जित सिंग यांच्यावर चंदीगड मधील पीजीआय रुग्णालयात हातावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. उपचारानंतर हरजीत सिंग यांचा सॅल्यूट करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.