‘भाजप’ला रोखण्याचा ‘महाविकासआघाडी’चा प्लॅन, ‘जिल्हा परिषदा’ एकत्र लढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभेच्या निवडणूका पार पडल्यानंतर आता महाविकासआघाडीने लक्ष घातले आहे ते जिल्हा परिषदेच्या निवडणूकांमध्ये. यासाठी महाविकासआघाडी आता तयारीला लागली आहे. भाजपला रोखण्यासाठी महाविकासआघाडीकडून ही खेळी करण्यात आली आहे. महाविकासआघाडीने 6 जिल्हा परिषदांच्या निवडणूका एकत्र लढण्याची तयारी सुरु केली आहे.

भाजपला रोखण्यासाठी महाविकासआघाडी राज्यातील विधानसभेनंतर पुन्हा एकत्र आले आहेत. विधानसभेचा पॅटर्न पुन्हा राबवला जाणार आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच 25 जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांच्या निवडणूक महाविकासआघाडी एकत्र लढणार आहेत.

तसेच 25 जिल्हा परिषदेच्या निवडणूका एकत्र लढण्यासाठी महाविकासआघाडीकडून संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती पक्षांमध्ये समन्वय साधणार आहेत. या समितीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते असणार आहेत. या संयुक्त समितीत शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, विनायक राऊत, अनिल देसाई. तर काँग्रेसकडून मोहन जोशी आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची वर्णी लागणार आहे.

या निवडणूका 30 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान होणार आहेत. त्यासाठी महाविकासआघाडीकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. महाविकासआघाडीतील सर्व पक्षांची ताकद पणाला लागणार असल्याने या निवडणूकांच्या माध्यमातून भाजप समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/