राज्यातील 10 वरिष्ठ पोलिस (SP/DCP/ACP) अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने आज (गुरूवार) १० पोलिस अधीक्षक / पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त / पोलिस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्य गृह विभागाने अलिकडेच पोलिस दलातील सर्वसाधारण बदल्या केल्या होत्या. त्यानंतर या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली झालेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे.

प्रशांत एम. मोहिते (पोलिस अधीक्षक, फोर्स वन, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलिस उपायुक्त, ठाणे शहर), श्रीमती कल्पना बारावकर (पोलिस अधीक्षक (प्रशासन), विशेष सुरक्षा विभाग, मुंबई (बदली आदेशाधीन) ते पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड), श्रीमती रूपाली खैरमोडे (अम्बुरे) – (पोलिस अधीक्षक, राज्यपाल सुरक्षा, विशेष सुरक्षा विभाग, मुंबई ते उपायुक्त, रज्य गुप्तवार्ता विभाग – व्हीआयपी सुरक्षा), किरणकुमार चव्हाण (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते पोलिस अधीक्षक, फोर्स वन, महाराष्ट्र राज्य, मुंबई), श्रीमती शिला दिनकर साईल (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते सहाय्यक पोलिस महानिरीक्षक / मुख्य संपादक, दक्षता / धोरण, महाराष्ट्र राज्य, मुंबई), विजय सुरेश चव्हाण (अप्पर पोलिस अधीक्षक, वाशीम ते पोलिस उपायुक्त, नागपूर शहर), विक्रांत देशमुख (अप्पर पोलिस अधीक्षक, अकोला ते अप्पर अधीक्षक, पालघर), पियुष जगताप (उपविभत्तगीय अधिकारी, मंगळूरपीर उपविभाग, जि. वाशीम ते उपविभागीय अधिकारी, वर्धा उपविभाग, जि. वर्धा), अविनाश तुकाराम qशगटे (सहाय्यक पोलिस आयुक्त, चांदूर रेल्वे, अमरावती ते सहाय्यक पोलिस आयुक्त, मुंबई) आणि सुनिल बोंडे (पोलिस उप अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, नागपूर ते सहाय्यक पोलिस आयुक्त मुंबई). अप्पर पोलिस अधीक्षक (पालघर) योगेश चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे मात्र त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –