पुणे : दत्तवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई ! सराईत चोरांकडुन 14 दुचाकी जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – शहरासह जिल्ह्यतील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्या कडून १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. संदिप दिलीप लवटे (वय 20, रा.मेढद ता.माळशिरस जि.सोलापुर) व अजित पांडुरंग वाघमोडे (वय 22, रा.जाधववाडी ता.माळशिरस, जि.सोलापुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर चोरीच्या दुचाकी कमी किंमतीत घेणाऱ्या सुरज कुमार बोरडे (रा.मारडी, ता.मान, जि.सातारा) याला अटक केली आहे.

शहरासह जिल्ह्यातुन दररोज १० ते १२ वाहने चोरीला जात आहेत. यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी चोरट्याना जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. यादरम्यान दत्तवाडी पोलीस ठाण्याचे तपास पथक वाहन चोरट्याची माहिती काढत होते, ज्या परिसरातून वाहने चोरीला जात होते, अशी ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून निवडले. त्या ठिकाणी साध्या वेषातील पोलीस याठिकाणी तैनात करण्यात आले होते. यावेळी बातमीदाराने माहिती दिली की, बाल शिवाजी चौक या ठिकाणी दोन युवक काळ्या रंगाची पल्सर घेवुन उभे आहेत त्यांच्याकडील पल्सर ही चोरिची आहे.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक देविदास घेवारे यांच्या मागर्दशनाखाली उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ, रविंद्र फुलपगारे, सोमेश्वर यादव, नवनाथ भोसले, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, अमित सुर्वे, अमोल लोहार, यांच्या पथकाने याठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दुचाकी बाबत चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.

मित्र सुरज ऊर्फ रुय्या कुंडलिक जाधव याच्या मदतीने पर्वती दर्शन येथुन काही दिवसापुर्वी चोरली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी शहरातील दत्तवाडी, खडक, सहकारनगर, भारती विद्यापीठ भागातील तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालयामधील दिघी आणि बारामती, सातारा शहर, दहीवडी, माळशिरस येथुंन दुचाकी चोरल्याचे सांगतिले. त्यांच्याकडून १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तर चोरीच्या दुचाकी घेणाऱ्या सुरज यालाही अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उप निरिक्षक कुलदिप संकपाळ हे स्वत: करीत आहेत.

Visit : Policenama.com