बांगला देशात ईद साजरी करताना भेसळयुक्त दारु पिल्याने 16 जणांचा मृत्यु

ढाका : वृत्त संस्था – बांगला देशातील उत्तर पश्चिम भागात रमजान ईद साजरी करताना विषारी दारु पिल्याने गेल्या तीन दिवसात तब्बल १६ जणांना आपले प्राण गमविण्याची पाळी आली आहे. या विषारी दारुमुळे जवळपास १२ हून अधिक जणांवर उपचार करण्यात येत आहेत.

याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, भेसळयुक्त दारु पिल्याने लोकांना त्रास झाला असून आतापर्यंत १६ जणांचा मृत्यु झाला आहे. त्यात काही जणांचा तर घरातच मृत्यु झाला. तर काही जणांना हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर उपचार सुरु असताना मृत्यु झाला.

याबाबत सरकारी वृत्तसंस्था बीएस एस यांच्या म्हणण्यानुसार दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये या लोकांचा मृत्यु झाला आहे. जेथे ही बेकायदेशीररित्या दारु बनविली जात होती, त्या जागाचा शोध घेऊन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like