काँग्रेसचे पदाधिकारी असलेले 2 आमदार भाजपच्या संपर्कात ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मंत्रिपदाचे डोहाळे लागलेले काँग्रेसचे राज्यातील दोन पदाधिकारी आणि नवनिर्वाचित आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. यापैकी एक पश्चिम महाराष्ट्रातील असून दुसरा विदर्भातील आहे. विशेष असे की आज विद्यमान सरकारचा कालावधी संपुष्टात येत असताना आणि नवीन सत्तेचा तिढा सुटलेला नसताना या आमदारांच्या हालचालींमुळे भाजपकडून काँग्रेस चे आमदार फोडण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेला पुष्टी मिळत आहे.

निवडणुकांचे निकाल लागून 14 दिवस झाले आहेत. महायुतीमध्ये लढलेल्या भाजप शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावरून तिढा अद्याप कायम आहे. भाजप आणि समर्थक आमदारांचे संख्याबळ 120 पर्यंत पोहोचले असून सत्तेसाठी अजून 25 आमदारांची गरज आहे. अशातच शिवसेनेने ताठर भुमिका घेतल्याने भाजपने सर्व पर्यायावर काम सुरू केले आहे. त्यातही केवळ विरोधी लाटेत निवडून आलेल्या काँग्रेसवर त्यांचा डोळा आहे. काँग्रेसचे 44 आमदार आहेत.

भाजपची यंत्रणा या 44 आमदारांवर लक्ष ठेवून आहे. त्यापैकी काही जणांना भाजपनं यापूर्वीही खुली ऑफर दिली आहे. परंतु त्या ऑफर नंतरही काहीजणांनी काँग्रेस मधेच राहणे पसंद केले होते. मात्र सध्याच्या सत्ता संघर्षात मंत्री पद खुणावू लागल्याने काहींची चलबिचल सुरू झाली आहे. त्यातही पक्षाचे पदाधिकारी असलेले दोन आमदार या मोहात गुरफटले आहेत. त्यांच्यामागे फारतर 3- 4 आमदारांचे बळ असल्याने तसा ही फोडाफोडी करूनही भाजपला सत्ता मिळवता येणार नाही. मात्र, या आमदारांची स्थिती नक्कीच कर्नाटकात भाजपला साथ देणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांसारखीच अर्थात न घरका ना घाटका अशी होईल, अशी चर्चा खुद्द काँग्रेस वर्तुळात सुरू झाली आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके