दिल्ली : घरात आली कामवाली बाई, 20 जणांना ‘कोरोना’ची लागण, 750 क्वारंटाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय राजधानीत पिझ्झा बॉयकडून कोविड – 19 च्या संसर्गाच्या प्रकारानंतर आता घरात काम करणारी हाऊसमेट म्हणजेच मोलकरीणमुळे साथीचा प्रसार होण्याची बातमी समोर आली आहे. दिल्लीतील पीतमपुरा भागातील एका घरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 20 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्याच वेळी 750 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मिळलेल्या माहितीनुसार, डीएम म्हणाले की, येथे गेल्या महिन्यात 24 मे रोजी कोरोनाची पहिली घटना उघडकीस आली. त्यानंतर, हे प्रकरण आणखी वाढले त्यांनतर संपूर्ण परिसर ताबडतोब सील करण्यात आला. या भागातील एका घरात काम करणार्‍या मोलकरीणमुळे हे संक्रमण पसरल्याचे सांगण्यात आले. या महिलेपासून पहिल्यांदा एका मुलाला नंतर घरातील इतर सदस्यांना संसर्ग झाला.

राजधानीत कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज नवीन प्रकरण आल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. गुरुवारी कोरोना संसर्गाची 1369 नवीन प्रकरणे आल्यामुळे दिल्लीकरांची चिंता वाढली आहे. या नवीन घटनांमुळे राजधानीत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 25000 च्या वर गेली. आता या आजाराने संक्रमित रुग्णांची संख्या 25004 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, या विषाणूच्या संसर्गामुळे 650 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, येथे पीतमपुरामध्ये येथे एका मोलकरीणमुळे 20 जणांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आणि 750 लोकांना क्वारंटाईन ठेवण्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिस्थिती आणखी चिघळली आहे. दिल्लीतील पितामपुरा येथील तरुण एन्क्लेव्हमध्ये 20 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर 3 जून रोजी संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला. जिल्ह्याच्या डीएमच्या म्हणण्यानुसार, कोरोना पॉझिटिव्हचे 20 रुग्ण एकत्र आल्यानंतर या भागास सील करण्यात आले. तसेच उत्तर एमसीडीला परिसर सॅनिटायझ करण्याचे काम देण्यात आले आहे.