देशाच्या इतिहासात 21 एप्रिलचं महत्व काय आहे ? शरद पवार यांनी स्वतःच सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  महाराष्ट्राने आजपर्यंत अनेक संकटावर मात केली आहे. लातूरचा भूकंप असो किंवा मुंबईतील बॉम्ब ब्लास्ट, दंगल अशी अनेक उदाहरणं राज्याच्या इतिहासात आहे. मात्र अशा वेळी प्रशासनाने परिस्थिती सामान्य करण्यासाठी काही तास देखील लावले नाही. हे कर्तृत्व महाराष्ट्रातील प्रशासन यंत्रणेने यापूर्वी देखील दाखवले आहे. आजच्या दिवशी २१ एप्रिल रोजी घडलेल्या एका गोष्टीचं मला आवर्जून स्मरण करावसं वाटत.

पोलीस प्रशासन, वैद्यकीय सेवा, शासकीय यंत्रणा अहोरात्र काम करत आहे. त्यांना देशाची व राज्याची स्थिती सावरायची आहे. या सर्वांबद्दल आत्मीयता दाखवण्याची, त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्याची गरज आहे. याची काळजी आपण घ्यायला हवी. महाराष्ट्राच्या प्रशासन यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे.

२१ एप्रिल १९४७ रोजी देशातील सिव्हिल सर्व्हंटस् अर्थात पहिली प्रशासकांची तुकडी बाहेर पडल्यावर त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होत. ते म्हणाले होते की, माझा तुमच्या सगळ्यांवरती आत्मविश्वास आहे. तुम्हा सर्वांच्या माध्यमातून देशाला एक भक्कम आधार मिळेल.

त्यावेळी प्रशासकांचा उल्लेख सरदार वल्लभभाई पटेल यांनी ‘स्टील फ्रेम ऑफ इंडिया’ असा केला होता. सरदार पटेल यांच्यासारख्या अनुभवी माणसाने जो संदेश प्रशासन यंत्रणेला दिला तीच परंपरा आज देखील कायम आहे व आपल्याला ती जपायची आहे. त्यामुळे प्रशासन यंत्रणेचे मी अभिनंदन करतो व कृतज्ञता व्यक्त करतो.

२१ एप्रिल रोजी भारत सरकार कडून दरवर्षी ‘राष्ट्रीय नागरी सेवा दिन’ साजरा केला जातो. या दिवशी प्रशासनातील उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि नागरिकांना पंतप्रधानांकडून पुरस्कार दिले जातात.

१९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकॅल्फ हाऊस येथे प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांना याच दिवशी संबोधित केलं होत. तेव्हा त्यांनी नागरी सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘स्टील फ्रेम ऑफ इंडिया’ म्हणून संबोधले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या दिवशी प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. देशात कोरोना संसर्गाला यशस्वीरीत्या पराभूत करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. गरजवंतांना मदतीसाठी सरसावणाऱ्या या अधिकाऱ्यांनी या संकटादरम्यान घड्याळाच्या काट्याकडे न पाहता २४ तास लोकांची सेवा बजावत आहे. अशा शब्दांत प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोदी यांनी शाबासकीची थाप दिली.