‘सुदानमध्ये झालेल्या कारखान्यातील स्फोटात 18 भारतीयांसह 24 जणांचा मृत्यू, 130 पेक्षा जास्त जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुदानमध्ये चीनी मातीच्या कारखान्यामध्ये एका एलपीजी टॅकरचा स्फोट झाल्याने 24 लोकांचा मृत्यू झाला. ज्यात अनेक भारतीयांचा समावेश आहे. या घटनेत 130 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले. सुदानच्या भारतीय दुतावासाने मंगळवारी झालेल्या घटनेत भारतीयांचा मृत्यू झाल्याची सूचना दिली. परंतू मृतांच्या संख्येबाबत माहिती दिली नाही.

दुतावासाने मंगळवारी आपल्या वेबसाइटवरुन सांगितले की, आतापर्यंत मिळालेल्या अहवालानुसार भारतीय कामगारांसह अनेक कामगारांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. त्यांनी सांगितले की कारखान्यात 50 पेक्षा जास्त भारतीय कामगार काम करत होते. सुदान सरकारने सांगितले की घटनेत 24 लोकांची मृत्यू झाला आणि 130 लोक जखमी झाले.

प्राथमिक अहवालानुसार घटनास्थळावर सुरक्षेसाठी कोणतीही आवश्यक उपकरणं नव्हती. सरकारने सांगितले की तेथे ज्वलनशील पदार्थांची मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात आली होती, ज्यामुळे आग अजून पसरली. प्रकरणाचा तपास सुरु आहे. तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेत 18 भारतीयांचा मृत्यू झाल्याचे सांगत कुटूंबाच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे सांगितले.

Visit : policenama.com