5 लाखाच्या लाचप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकासह 3 पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुटखा वाहतुकीची खोटी केस न करण्यासाठी 5 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 1 लाख 50 हजार रूपयाची लाच घेण्याचे कबुल करून 50 हजाराचा पहिला हप्ता स्विकारल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकासह 3 पोलिस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकले आहेत. गुटखा प्रकरणी दीड लाख रूपयाच्या लाचप्रकरणी 3 पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

हरिश कांबळे (34, पोलिस उपनिरीक्षक, महात्मा फुले पोलिस स्टेशन, कल्याण पश्चिम), अंकुश नरवणे (57, पोलिस हवालदार, महात्मा फुले पोलिस स्टेशन, कल्याण पश्चिम) आणि भरत येसु खाडे (49, पोलिस नाईक, महात्मा फुले पो.स्टे., कल्याण पश्चिम) अशी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकलेल्या पोलिसांची नावे आहेत. याप्रकरणी 50 वर्षीय व्यक्तीने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. गुटखा वाहतुकीची खोटी केस न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक हरिश कांबळे आणि इतर 2 पोलिसांनी तक्रारदाराकडे 5 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 1 लाख 50 हजार रूपये देण्याचे ठरले. त्याचा पहिला हप्ता म्हणून 50 हजार रूपये तात्काळ देण्याचे तक्रारदाराने कबुल केले.

दरम्यान, तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीची खातरजमा करण्यात आली. सापळा रचला असता पोलिस नाईक भरत येसु खाडेंनी 50 हजार रूपयाची लाच स्विकारली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

Visit : Policenama.com