शिर्डी लोकसभा मतदारसंघात 30 जणांचे 44 उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आज एकुण 20 जणांनी 22 नामनिर्देशनपत्र दाखल केले. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आजअखेर 30 जणांनी 44 नामनिर्देशनपत्र दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे यांच्याकडे त्यांनी हे अर्ज सादर केले.

आज नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे:- संपत खंडू समिंदर (अपक्ष 2 अर्ज ), अमोलिक गोविंद बाबुराव (अपक्ष 1अर्ज ), सरोदे अंबादास लक्ष्मण (अपक्ष 1 अर्ज ), सचिन शहादेव गवांडे (अपक्ष 1 अर्ज ), अशोक जगदीश जाधव (राष्ट्रीय मराठा पार्टी 1अर्ज ), जयंतकुमार ताराचंद आहेर (अपक्ष 1अर्ज ), वाघमारे प्रकाश गुलाब (अपक्ष 1 अर्ज ), जगधने सुरेश एकनाथ (बहुजन समाज पार्टी 1अर्ज ), अशोक अनाजी वाकचौरे (अपक्ष 1 अर्ज ), किशोर लिंबाजी रोकडे (अपक्ष 1 अर्ज ), बापू पाराजी रणधीर (अपक्ष 2 अर्ज ), भाऊसाहेब जयराम वाकचौरे (अपक्ष 1अर्ज ), सुभाष दादा त्रिभुवन (अपक्ष 1 अर्ज ), प्रदिप सुनिल सरोदे (अपक्ष 1 अर्ज ), राजेंद्र रत्नाकर वाघमारे (अपक्ष 1अर्ज ), बागुल भुमिका आशिष (अपक्ष 1 अर्ज ), विजय ज्ञानोबा घाटे (रिपब्लिकन बहुजन सेना 1 अर्ज ), बोरगे शंकर हरिभाऊ (अपक्ष 1अर्ज ), संजय लक्ष्मण सुखदान (वंचित बहुजन आघाडी 1 अर्ज ), गायकवाड संतोष भानुदास (अपक्ष 1अर्ज ) दाखल केले असल्याचीमाहिती निवडणूक यंत्रणेने दिली.