मशरूम खाण्याचे ‘हे’ आहेत 5 मोठे फायदे, आजचा आपल्या डाएटमध्ये सहभागी करा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  हार्वर्ड टी. एच. चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थनुसार, सर्व प्रकारच्या मशरूममध्ये कॅलरी आणि फॅट कमी असते. याशिवाय मशरूममध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन सी,बी,डी, कॉपर, पोटॅशियम, फॉस्फरस, सेलेनियम, फायटोकेमिकल्स आणि अँटीऑक्सिडंटसारखी अन्य पोषकतत्वसुद्धा आढळतात. मशरूम खाण्याचे असे 5 फायदे जे जाणून घेतल्यानंतर तुम्ही ताबडतोब हे आपल्या डाएटमध्ये सहभागी करून घ्याल.

हे आहेत फायदे

1 मजबूत इम्युनिटी सिस्टिम

मशरूम इम्युनिटी सिस्टिम मजबूत करते. संसर्गापासून बचाव होतो. मशरूम सेवन केल्याने वजन वाढणे आणि लठ्ठपणाची समस्यासुद्धा कमी होते.

2 हृदयरोगापासून वाचवते

मशरूममध्ये कमी कॅलरी आणि फॅट जवळपास नसल्यासारखेच असते. यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो. ब्लड प्रेशर आणि अन्य हार्टसंबंधी आजार दूर राहतात.

3 तारुण्य वाढवते

मशरूम मेंदू आणि शरीराला तरुण ठेवते. मेंदूच्या पेशींची सुरक्षासुद्धा करते. स्मरणशक्ती वाढते. डिमेंशिया, पार्किंसन्स आणि अल्जायमरसारख्या आजारांचा धोका कमी होतो.

4 हाडे मजबूत होतात

मशरूममधील व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस हाडांच्या निर्मितीसह ती मजबूत ठेवण्यास मदत करते. हाडांशी संबंधी आजार जसे की, ऑस्टियोपोरोसिस, हाडांमध्ये वेदना दूर होतात.

5 मजबूत पचनशक्ती

मशरूमच्या सेवनाने पचनशक्ती मजबूत होते. पोटाचे आरोग्य राखण्याससुद्धा मदत होते.

You might also like