‘या’ 5 खाद्य पदार्थांनी चांगले राहील पुरूषांचे आरोग्य, करा डाएटमध्ये समावेश

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   योग्य आहारच पुरूषांना निरोगी बनवू शकतो आणि त्यांना अनेक प्रकारच्या गंभीर आजारांपासून दूर ठेवू शकतो. प्रोस्टेट समस्या, लठ्ठपणा आणि कमजोर मांसपेशी इत्यादीपासून वाचण्यासाठी पुरूषांनी चांगला आहार घेतला पाहिजे. यासाठी आम्ही आपल्याला 5 अशा खाद्य पदार्थांबाबत सांगणार आहोत, जे पुरूषांच्या आरोग्यासाठी खुप लाभादायक आहेत.

हे आहेत ते पदार्थ

1. कडधान्य

कडधान्य पुरूषांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. हे एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. प्रोस्टेट आरोग्यासह मांसपेशी निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी आहे. कडधान्य डाळीच्या रूपात सुद्धा सेवन करू शकता.

2. पालक

पालक सेवन केल्याने रक्तवाहिन्या पातळ करतो, चांगले रक्ताभिसरण होते. होमोसिस्टीनचा स्तर कमी करण्यास उपयोगी आहे.

3. बीया आणि नट्स

बीया आणि नट्सच्या सेवनाने एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. रक्ताच्या गुठळ्यांची समस्या कमी होते. प्रोस्टेट आणि कोलन कँसरचा धोका कमी करण्यात मदत होते.

4. फॅटी फिश

सामन, मॅकेरल, किंवा सार्डिन हे फॅटी फिश पुरूषांसाठी चांगले आहे. यातील वसा आणि ओमेगा-3 मुळे मेंदू नेहमी निरोगी राहतो, प्रोस्टेट कँसरचा धोका कमी होतो.

5. ऑयस्टर

ऑयस्टर सेवन केल्याने प्रोस्टेट कँसर सारखी घातक स्थिती कमी होते. टेस्टोस्टेरोन उत्पादनात मदत होते.

You might also like