वजन कमी करायचंय ? दिवसातून फक्त ‘इतकी’ पावलं चाला ! जाणून घ्या ‘हे’ 6 महत्त्वाचे फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि व्यायाम करणं शक्य नसेल तर केवळ चालण्याच्या माध्यमातूनही तुम्ही वजन कमी करून हेल्दी राहू शकता. एका अभ्यासातून काही खुलासे झाले आहेत. यासाठी तुम्हाला 10 हजार पावलं चालणं गरजेचं आहे.

ब्रिटेनच्या ब्रिघम यंग विद्यापीठातील सशोधकांनी 120 कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर अभ्यास केला आहे. या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना 6 दिवस 10-12 हजार आणि 15 हजार पावले चालण्यास सांगितलं. विद्यापीठातील एका प्रोफसरनं सांगितलं की, सुरुवातीलाच स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचं वजन 1-4 किलो पर्यंत कमी झालं होतं.

तुम्ही रोज 30 मिनिटे चालत असाल तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज भासत नाही. यात इतर काही कसरत करण्याचीही गरज नाही. हा सर्वात सोपा आणि उत्तम व्यायाम आहे. अभ्यासातून असंही समोर आलंय की, चालताना तुम्ही जर पावलांवर लक्ष ठेवलं तर शारीरिक समस्या कमी होतात. तसंच वजन कमी होतं आणि नियंत्रणात राहतं.

रोज आणि नियमित चालण्याचे फायदे –

– शरीरातील कॅलरीज बर्न होतात

– तुमची क्रिएटीव्हिटी वाढते.

– पनचक्रिया सुधारते. मलबद्धता किंवा पचनाचे इतर विकार होत नाहीत

– मनाच्या एकाग्रतेसाठी आणि चिंतनासाठी फायदा होतो

– पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळतं.

– रोज 1 तास चाललात तर संधीवाताचा त्रास कमी होतो.