Pune : मास्क न घालता वावरणार्‍यांना 500 रूपये तडजोड शुल्क अथवा कलम 188 नुसार कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मास्क परिधान न करता सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये व खासगी कार्यालयामध्ये संचार करताना आढळल्यास त्यांच्यावर 500 रूपये तडजोड शुल्क अथवा भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कारवाई केली जाणार आहे.

त्याबाबतचे आदेश पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी आज काढले आहेत. मनपा आयुक्तांनी शहरातील सर्व 15 क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

क्षेत्रीय कार्यालय प्रमुख, उप आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक ही कारवाई करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.