चीनमध्ये खुले करण्यात आले 500 थिएटर्स ! कोरोनाच्या भीतीनं एकही तिकीट विकलं गेलं नाही

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसची दहशत जरी जगभर पसरत असली तरी ज्या देशातून ज्या व्हायरसची सुरुवात झाली होती त्या चीनमधून मात्र गेल्या काही दिवसांपासून एकही कोरोनाचं प्रकरण समोर आलं नाही. चीनच्या वुहान शहारतून या व्हायरसला सुरुवात झाली होती. अजून लोकांमध्ये याची दहशत कायम आहे.

चीनमध्ये जानेवारी नंतर 500 थिएटर सुरू करण्यात आले जे कोरोनामुळं बंद होतं. हैराण करणारी बाब अशी की, थिएटर सुरू केल्यानंतर एकही तिकीट विकलं गेलं नाही. कोरोनाच्या भीतीनं कोणीही सिनेमा पाहण्यासाठी आलं नाही.

एका इंग्रजी वृत्तानुसार, चीनमध्ये एकूण 70 हजारांहून अधिक सिनेमागृह आहेत. परिस्थिती सामान्य होत आहे हे पाहिल्यानंतर 500 सिनेमागृहे खुली करण्यात आली होती. सोमवारी 507 सिनेमागृहे सुरू करण्यात आली. ही सर्व चीनच्या अंतर्भागात स्थित आहे. या ठिकाणी कोरोनाच्या केसेस झाल्या नव्हत्या. तरीही चीनच्या दो प्रोविंस फुजिआन आणि गुंआंगडाँग मध्ये शुक्रवारी एकही तिकीट विकलं गेलं नाही. एकूण कमाई 2000 डॉलरपेक्षाही कमी होती.

मुव्ही बिजनेस अ‍ॅनलिस्ट अतुल मोहननं ट्विट करत सांगितलं की, कोरोनाची भीती कमी होत आहे हे पाहून चीनमध्ये सर्व स्थिती पहिल्यासारखी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like