लडाख सीमेवरील तणावादरम्यानच जुलैच्या अखेरीस भारतात पोहचेल 6 राफेल लढावू विमान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारत-चीन सीमेवर सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. जुलै अखेरपर्यंत भारताला 6 लढाऊ राफेल विमान मिळतील. मिळालेल्या माहितीनुसार ही सर्व विमाने पूर्णपणे दारुगोळ्याने भरलेली असतील. हे स्पष्ट आहे की, एकदा विमाने भारतात पोहोचल्यानंतर कोणत्याही वेळी त्याचा उपयोग शत्रूच्या योजना हाणून पाडण्यासाठी केला जाऊ शकतो. दरम्यान, चीनशी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राफेलचे भारतात आगमन फार महत्वाचे आहे. जर येत्या काळात चीनशी युद्ध झाले तर संपूर्ण प्रकरण वायुसेनेच्या शूर अधिकाऱ्यांवर अधिक अवलंबून असेल. कारण गलवान खोऱ्यात पुढे जाणाऱ्या भारतीय सैन्याला चिनी सैन्याला उत्तर देण्यासाठी हवाई दलाच्या मदतीची आवश्यकता असेल. अशा वेळी राफेल महत्वाची भूमिका साकारणार आहे.

विशेष विनंतीनुसार वेळेपूर्वी फ्रान्स देणार राफेल

पूर्व लडाखमधील भारत-चीन सीमेवर दीर्घकाळ निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्स लवकरच राफेल विमान भारतात पाठवणार आहे. भारतीय वायुसेनेच्या विशेष विनंतीनंतर फ्रान्स ही विमाने वेळेपूर्वी भारतात पाठवेल. एएनआयने सोमवारी या संदर्भात ट्विट करुन ही माहिती दिली. त्याशिवाय, 27 जुलैला सहा राफेल लढाऊ विमानांची पहिली मालवाहतूक अंबाला एअरबेसवर दाखल होणार असल्याचे समजते. पहिल्या चार तुकड्यांमध्ये प्रथम चार विमाने येणार होती, परंतु आता 6 राफेल येणार असल्याचे आहे. दरम्यान, या संदर्भात भारतीय हवाई दलाच्या प्रवक्त्यांकडे माहिती मागितली गेली तर त्यांनी कोणतेही उत्तर देण्यास नकार दिला.

फ्रान्सबरोबर 36 राफेल लढाऊ विमानांची करण्यात आली डील-

सप्टेंबर 2016 मध्ये भारताने फ्रान्सबरोबर 36 राफेल लढाऊ विमानांसाठी डील केली. हा करार सुमारे 59 हजार कोटींचा होता. या विमानांमुळे भारतीय हवाई दलाला अधिक सामर्थ्य मिळणार आहे. उपलब्ध माहितीनुसार सुमारे 10 राफेल लढाऊ विमान डसॉल्ट एव्हिएशनद्वारे तयार आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या अबू धाबीजवळील अल ढफरा विमानतळावर स्टॉपवेअर सोबत जुलैच्या अखेरीस सहा राफेल लढाऊ विमान भारतात आणण्याची तयारी सुरू आहे. हे विमान भारतीय वैमानिकांनी उड्डाण करून आणतील.