फायदेशीर ‘अ‍ॅलोवेरा’चे ‘हे’ 6 साईड्स इफेक्ट्स, चुकूनही करू नका ‘या’ चुका, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तुम्ही अ‍ॅलोवेरा म्हणजेच कोरफड खाण्याचे अनेक फायदे ऐकले असतील. यात अँटीइम्फ्लेमेटरी गुण असतात जे आपल्या आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असतात. परंतु अ‍ॅलोवेराचे साईड इफेक्ट्सही असतात हे तुम्हाला माहिती आहे का ? आज आपण याबद्दल माहिती घेणार आहोत.

1) ट्युमर होण्याची शक्यता –
अ‍ॅलोवेरामध्ये अ‍ॅलोईन नावाचं एक रसायन असतात. एका शोधातून असं समोर आलं आहे की, यामुळे ट्युमर होण्याची शक्यता असते. अ‍ॅलोईन कोरफडीच्या बाहेरच्या भागावर असतं. अ‍ॅलोवेरा प्रॉडक्ट्स तयार करताना चारकोल फिल्टरचा वापर करून हे रसायन काढलं जातं.

2) पोटदुखी आणि पोटात कळा येणं –
कोरफड लॅटेक्स रबर सारखी असते यामुळे पोटदुखी तसेच स्टमक क्रॅम्प्स होण्याची म्हणजेच पोटात कळा येण्याची शक्यता असते.

3) 12 वर्षांच्या मुलांना चुकूनही देऊ नका –
12 वर्षांच्या मुलांना पिण्यासाठी अ‍ॅलोवेरा कधीच देऊ नका. यामुळे त्यांना पोटदुखीची समस्या होऊ शकते.

4) डायबिटीज असेल तर –
डायबिटीज पेशंटसाठी कोरफडीचा ज्यूस चांगला असतो. यानं ब्लड शुगर कमी रहाते. परंतु तुम्ही जर असं करत असाल तर तुम्हाला ब्लड शुगर वारंवार अपडेट करत राहणं गरजेचं आहे.

5) सर्जरी करणार असाल तर –
जर तुम्हाला एखादी सर्जरी करायची असेल तर त्याआधी कोरफडीचा ज्यूस पिऊ नका. कारण यामुळे ब्लड शुगर कमी होते.

6) प्रेग्नंट महिला
जर एखादी महिला प्रेग्नंट असेल तर तिनं कोरफडीचं सेवन अजिबात करू नये. कारण यामुळ गर्भाशय संकुचित होण्याचा धोका जास्त असतो.

फेसबुक पेज लाईक करा –