खुशखबर ! रात्रपाळी केल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळणार अधिक पगार

पोलिसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मान्यता दिली आहे. त्यानुसर केंद्रीय कर्मचार्‍यासाठी नाईट ड्युटी अलाउंस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कार्मिक व प्रशिक्षण विभागाने नर्देश जारी करत माहिती दिली आहे. हे निर्देश 13 जुलै रोजी जारी करण्यात आले असून त्यांची अंलबजावणी 1 जुलै 2020 पासून लागू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सर्व कर्मचार्‍यांसाठी सध्याच्या व्यवस्थेनुसार विशेष ग्रेड पेवर आधारित नाइट ड्यूटी अलाउंस बंद केला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याआधी ग्रेड पेच्या आधारावर केंद्रीय कर्मचार्‍यांना नाइट ड्यूटी अलाउंस दिला जात होता.

ज्या प्रकरणांमध्ये नाइट वेटेजच्या आधारावर कामाचे तास मोजले जातील, त्या प्रकरणांमध्ये कोणताच अतिरिक्त निधी देण्यात येणार नाही. रात्रीच्या वेळी केलेले काम हे तासाला 10 मिनिट वेटेजच्या हिशेबाने मोजले जाणार आहे . रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान कामालाच नाईट ड्युटी समजले जाणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. नाइट ड्युटी अलाउंससाठी बेसिक पेच्या आधारावर एक मर्यादा ठरवली जाईल. ‘नाइट ड्युटी अलाउंससाठी बेसिक पेची मर्यादा ही 43 हजार 600 रुपये प्रती महिना या आधारावर निर्धारित करण्यात आली आहे.’