Online बॅंकिंग फेल होण्याचे प्रमाण 8 बॅंकांमध्ये सर्वाधिक; निम्म्या आहेत सरकारी बॅंका

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   यंदाच्या सण- उत्सवाच्या हंगामात ऑनलाइन ट्रान्झॅक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या व्यवहारामध्ये बॅंकांची असक्षमता समोर आली आहे. यात जवळपास 8 बॅंकांमधील ऑनलाइन व्यवहारात लोकांना मनस्ताप सहन करावा (8-banks-suffer-higher-rate-failure-digital-transactions) लागला आहे. यातील निम्या बॅंका या सरकारी आहेत.

नॅशनल पेेंमेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सलग दुस-या महिन्यात टेक्निकल फेल्योर रेट 3 टक्क्यांहून अधिक नोंदवला गेला आहे. बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते 0.1 टक्के टेक्निकल फेल्योर रीअल टाईम फंड ट्रान्सफरसाठी चिंतेचा विषय असतो. एनपीसीआयच्या डेटानुसार, पेटीएम बॅंक व्यवहारात 0.02 इतका सर्वांत कमी फेल्योर रेट झाला आहे, तर सरकारी मालकीच्या बॅंकेतील ग्राहकांना ऑनलाइन ट्रान्झॅक्शन फेल होण्याचे प्रमाण अधिक आहे. तांत्रिक बाबीमुळे व्यवहार हा अपूर्ण राहण्याचा दर हा जवळपास 14.8 टक्के एवढा झाला आहे. यात बॅंक ऑफ इंडिया 4.2 तर स्टेट बँक ऑफ इंडिया 3.7 टक्के ट्रान्झॅक्शन फेल झाले आहेत.

सरकारी बॅंकांपेक्षा खासगी बॅंका ठरल्या सरस

ट्रान्झॅक्शन फेल होण्याच्या यादीत सरकारी बॅंकांच्या तुलनेत खासगी बॅंकांचे प्रमाण कमी आहे. एचडीएफसी बॅंक, अ‍ॅक्सिस बॅंक, आयसीआयसीआय बॅंकेत 1 टक्क्यापेक्षा कमी ट्रान्झॅक्शन डिक्लाइन झाले आहेत. कोटक महिंद्रा बँकेतील 2.36 ट्रान्झॅक्शन फेल झाल्याचे समोर आले आहे. एनबीटीच्या वृत्तानुसार, यंदाच्या सीझनमध्ये रोख व्यवहारामध्ये मोठी घट झाली आहे. ई- कॉमर्स क्षेत्रातील अ‍ॅमेझान, फ्लिपकार्टवर केवळ 25 टक्के व्यवहार हे रोखीने झाले आहेत. मागच्या वर्षी रोखीच्या व्यवहाराची टक्केवारी 60-65 टक्के होती. रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनुसार, 23 ऑक्टोबरपर्यंत 29.19 लाख कोटी रुपयांचे चलन लोकांच्या हातात आहे. ही रक्कम मार्चच्या तुलनेत 11.5 टक्के अधिक आहे.