पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न मध्यरात्री करण्यात आला. त्यामुळे पुणे पोलिसांनी या टिष्ट्वटरवरुन काही मेसेज आले तर त्याला उत्तर देऊन नका असा मेसेज पाठविला होता. त्यानंतर हे अकाऊंट रिस्टोअर करण्यात आले.
गुरुवारी रात्री ११ वाजून ५४ मिनिटांनी पोलीस आयुक्तांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले. त्याच्यावर विचित्र मेसेज पाठविण्यात आले. ही बाब काही वेळातच पोलिसांच्या लक्षात आली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवरुन मेसेज पाठवून सीपीपुणेसिटी या अकाऊंटवरुन कोणतेही मेसेज आल्यास त्याला उत्तर देऊ नका.
सायबर पोलीस त्यात लक्ष घालत आहेत. असा मेसेज मध्यरात्री १२ वाजून १७ मिनिटांनी देण्यात आला.त्यानंतर काही वेळाने हे अकाऊंट पुन्हा रिस्टोअर करण्यात आले. याबाबत सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत.