मुंबईतील माझगाव परिसरातील GST भवनातील 8 व्या मजल्यावर आग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील माझगाव परिसरातील जीएसटी भवनाच्या नव्या इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या 8 व्या मजल्यावर आग लागली आहे. धुराचे मोठे लोट या इमारतीच्या 8 व्या मजल्यामधून बाहेर येताना दिसत आहे. आज कामकाजाचा दिवस असताना इमारतीला आग लागल्याने चितेंची परिस्थिती आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या रवाना होत आहेत. काही गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

ही आग भीषण आहे. परंतु जखमी आणि जीवतहानीची कोणतीही माहिती समोर आली नाही. कर्मचाऱ्यांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, आग लागल्याचे कळताच इमारत खाली करण्यास सुरुवात झाली होती. परंतु याबाबत अद्यात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आपली वाय. बी चव्हाण येथे सुरु असलेली बैठक सोडून घटनास्थळी रवाना झाले आहेत.

जीएसटी भवनातील कार्यालयाला लागलेली आग वाढत आहे. कार्यालयात जीएसटीसंबंधित कागदपत्र, लाकडी कपाटं असल्याने आग आणखी पसरु शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

You might also like