भिकार्‍याचा मृत्यू, झोपडीत मिळाले ‘एवढे’ पैसे की सर्वांचीच उडाली ‘भंबेरी’

नवी दिल्ली : वृत्तसंथा – मुंबईमधील गोवंडी स्टेशनवर एका भिकाऱ्याचा लोकलने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला त्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांची चौकशी करत थेट त्याचे घर शोधले आणि पोलिसांना धक्काच बसला. कारण त्या मृत व्यक्तीच्या घरात पैशानी भरलेल्या पिशव्या आणि पोती सापडली. यामध्ये दोन लाखांची चिल्लर आणि काही कॅश रक्कम होती. हे पैसे मोजण्यासाठी पोलिसांना जवळजवळ आठ तास लागले.

पोलिसांनी घराची तपासणी केली असता मिळालेल्या पासबुकवरून मृत व्यक्तीच्या बँक खात्यात 8 लाख 77 हजार रुपये असल्याचे उघड झाले आहे. बिरभिचंद आजाद असे मृत व्यक्तीचे नाव असून ही व्यक्ती मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये भीक मागत असे. शुक्रवारी रेल्वे लाईन ओलांडताना लोकलच्या धडकेने त्यांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांना आजादच्या घरी आधार कार्ड, पॅनकार्ड आणि सिनिअर सिटीजन कार्ड मिळाले आहे ज्यावर राजस्थानचा पत्ता आहे. त्याच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की या आधी आजाद आपल्या कुटुंबासोबत राहत होता मात्र नंतर त्याचे कुटुंब निघून गेले आणि तो एकटा राहू लागला.पोलिसांनी भिकाऱ्याच्या घरी सापडलेले पैसे जप्त केले असून परिवाराला शोधण्यासाठी आधार कार्डच्या पत्त्यावर एक टीम रवाना केली आहे.

Visit : Policenama.com