भारताचे पहिले नौदल प्रमुख अन् समुद्रातील गनिमी काव्याचे जनक कान्होजी आंग्रेंच्या जीवनावर बनणार सिनेमा ! रिलीज झालं पोस्टर

पोलीसनामा ऑनलाईन टीम : लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एक ऐतिहासिक सिनेमा येणार आहे. समुद्रातील गनिमी काव्याचे जनक कान्होजी आंग्रे यांचा जीवनप्रवास आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कान्होजी आंग्रेंची दुश्मनांमध्ये एक वेगळीच धास्ती होती. त्याची शौर्यगाथा आता पडद्यावर उलगडताना दिसणार आहे.

काय आहे सिनेमाचं नाव
कान्होजी आंग्रे भारताचे पहिले नौदल प्रमुख होते. समुद्रातील शिवाजी म्हणून त्यांचा अखंड मुलखात परिचय होता. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग फक्त समुद्रालाच माहित होता. कान्होजी आंग्रेंच्या शौर्यगाथेवर आधारीत सिनेमाचं नाव कान्होजी आंग्रे आहे.

तरीही ते दर्यासारंग कान्होजी आंग्रेंचा पराभव करू शकले नाही
कान्होजी आंग्रेंची धास्ती संपूर्ण युरोपच्या नौसेनेला होती. विशेष बाब अशी की, कान्होजी आंग्रेंचा पराभव करण्यासाठी इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज असे सगळेच एकत्र आले होते. परंतु तरीही ते दर्यासारंग कान्होजी आंग्रेंचा पराभव करू शकले नाही. अशाच शौर्यवान कान्होजी आंग्रेचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा या हेतूनं कान्होजी आंग्रे सिनेमाची निर्मिती केली जाणार आहे.

कास्टींगबद्दल थोडक्यात…
आता फक्त सिनेमाची घोषणा झाली आहे. प्रेक्षकांमध्ये या सिनेमाला घेऊन उत्सुकता निर्माण झाली आहे. परंतु सिनेमाच्या कास्टींगबद्दल अद्याप काही माहिती समोर आलेली नाही.

कधी होणार रिलीज ?
सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर डॉ सुधीर निकम यांनी हा सिनेमा लिहिला आहे. 2022 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे अशी माहिती आहे. या सिनेमाची निर्मिती राहुल जाधव आणि राहुल भोसले करणार आहेत.