प्रजासत्ताक दिनानिमित्त ABVP नं काढली भव्य रॅली, 1111 फुट तिरंग्यानं वेधलं धुळेकरांचं लक्ष

धुळे : पुणे पोलीसनामा – 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज (शनिवार) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीतील 1111 फुट तिरंग्यानं धुळेकरांचं लक्ष वेधलं.

देवपूरातील एसएसव्हीपीएस मैदानातून माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, वास्तुतज्ञ रवी बेलपाठक, प्राचार्य पीपी जोशी यांच्या उपस्थितीत रॅलीला हिरवी झेंडा दाखवून सुरवात करण्यात आली. रॅली देवपूरातील जुना आग्रारोड मार्गाने सुशीनाला नेहरु चौक-पंचवटी-मोठापुल-गांधी चौक- फुलवाला चौक- कराचीवाला खुंट – सराफ बाजार- शहर पोलीस चौकी- जे.बी.रोड -टॉवर बगीचा- उर्दुशाळा- तहसिलदार कार्यालय चौक- कारागृह मार्गाने क्यामाईन क्लब रस्त्यावर रॅलीचा समारोप करण्यात आला.

यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले. रॅलीत तिरंगा ध्वजासह भारत माता वेशभुषेतील तरुणीने सगळ्यांचे लक्ष रॅलीकडे वेधुन घेतले. रॅलीत भारत माता की जय, वंदे मातरम, नागरीक कायदा सीसीए च्या समर्थनार्थ घोषणा देत विद्यार्थांनी परिसर दणाणुन सोडला.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like