एक लाखाची लाच घेणार्‍या नायब तहसीलदारासह खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड / गेवराई : पोलीसनामा ऑनलाइन – अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर सोडविण्यासाठी एक लाख रूपयाची लाच घेणारा नायब तहसीलदार आणि खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकला आहे. ही कारवाई झाल्यानंतर संपुर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

गेवराई येथील नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडे आणि खासगी व्यक्ती माजीद शेख अशी त्यांची नावे आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलिस उपाधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. नायब तहसीलदार लोखंडे यांनी खासगी व्यक्ती माजीद शेख यांच्यामार्फत लाच घेतली असल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांच्याविरूध्द गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई चालु आहे.

फेसबुक पेज लाईक करा

You might also like