२५ हजाराच्या लाचप्रकरणी पोलिस हलवादार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाइन – रिकाम्या प्लॉटवर अतिक्रमण केल्याच्या वाद मिटवल्यानंतर मध्यस्थीसाठी तक्रारदाराकडे २५ हजाराची मागणी केल्याप्रकरणी पोलिस हवालदाराविरूध्द अ‍ॅन्टी करप्शन विभागाने नंदूरबारमधील तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दशरथ राजाराम चव्हाण (बक्कल नं. २७, तळोदा पोलिस स्टेशन, रा. नंदूरबार) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांनी तळोदा पोलिस ठाण्यात ८ जून रोजी त्यांच्या रिकाम्या प्लॉटवर अतिक्रमण केल्याबाबत तक्रार अर्ज केला होता. प्लॉटचा वाद मिटवल्यानंतर पोलिस हवालदार दशरथ चव्हाण यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली.

२५ हजार रूपयाची लाच तक्रारदारास नातेवाईकांकडे ठेवण्यास सांगितले होते. मात्र, तक्रारदारांनी तसे केले नाही. अखेर पोलिस हवालदार चव्हाण यांना अ‍ॅन्टी करप्शनच्या कारवाईचा संशय बळावला. त्यानंतर त्यांनी लाचेची रक्कम घेण्यास नकार दिला. २५ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी चव्हाण यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उप अधीक्षक गिरीश जाधव यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. नाशिक विभागाचे अधीक्षक सुनिल कडासने आणि अप्पर अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –