अजित पवारांना मोठा दिलासा ! सिंचन घोटाळ्यात ‘क्लीन चिट’, ACB कडून निर्दोष असल्याचं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. सिंचन घोटाळयाप्रकरणी अजित पवार निर्दोष असल्याचं प्रतिज्ञापत्र न्यायालयात देण्यात आले आहे. अजित पवारांना ही पुर्णपणे क्लीन चिट देण्यात आली आहे.

यामुळं अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, निवृत्त अधिकारी विजय पांढरे यांनी काही वृत्तवाहिन्यांना प्रतिक्रिया देताना पुर्वीचे दाखले देत आपली व्यवस्था कोणत्या थराला गेली आहे असं म्हंटलं आहे. त्यांनी तत्कालीन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक संजय बर्वे यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा दाखला दिला.

दरम्यान, त्यांनी सध्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखांच्या चौकशीची देखील मागणी प्रतिक्रिया देताना केली आहे. चितळे समितीच्या अहवालात देखील अनेक बाबीं आहेत. त्या कोणीही वाचल्या नाही असं मत विजय पांढरे यांनी नोंदवलं आहे.

थेट न्यायालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखांनी अजित पवार निर्दोष असल्याचं प्रतिज्ञापत्र दिल्यानं एकप्रकारे अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/