धुळे-जळगाव महामार्गावर भीषण अपघातात 1 ठार, 1 गंभीर जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय महामार्ग 6 वर अपघातांचे सत्र हे सुरूच असून आज दि. 6 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास म्हसवे गावाजवळ धुळेकडून जळगाव येथे लग्नासाठी जाणार्‍या मोटर सायकलसस्वारास (एमएच.41.पी.8620) समोरून येणार्‍या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटरसायकलवरील सलमान अफजल खान पठाण (वय-27, राहणार-लाला सरदार नगर, देवपूर धुळे) हा जागीच ठार झाला. तर तर मूसबीर शेख मुस्ताक (वय-26, राहणार – देवपूर धुळे) हा गंभीररित्या जखमी झाला आहे.

जखमींवर कुटीर रुग्णालय येथे औषध उपचार करण्यात येऊन पुढील उपचारार्थ धुळे येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान धडक देणारे अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले आहे. अपघाताची माहिती कळताच नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत महामार्गावरील खड्डे बुजण्याची मागणी केली. पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून वाहतूक सुरळीत केली आहे. दरम्यान, उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे काम हे सुरू होते.

Visit : Policenama.com