Accident On Old Mumbai-Pune Highway | जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी, वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी कडक उपाययोजना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात (Accident On Old Mumbai-Pune Highway) कमी करण्यासाठी अद्ययावत आयटीएम्स यंत्रणा बसविण्यात येत असून वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी विधानपरिषदेत (Vidhanparishad) सांगितले. (Accident On Old Mumbai-Pune Highway)

जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात (Accident On Old Mumbai-Pune Highway) कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सदस्य भाई जगताप (Congress Bhai Jagtap) यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अत्याधुनिक आयटीएम्स यंत्रणा (IT Asset Management System) बसविण्यात येणार आहे जेणेकरून लेनची शिस्त न पाळणाऱ्यांवर कारवाई करता येईल. मिसिंग लिंक देखील पूर्ण होणार आहे.
तसेच आताही लेनची शिस्त न पाळणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांद्वारे (Highway Traffic Police) कारवाई करण्यात येत आहे.
तसेच मोटार वाहनांचा दंड वसुली करण्यासाठीही सर्व वाहनचालकांचे अद्ययावत मोबाईल क्रमांकाची माहिती करण्यात येईल,
असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

या प्रश्नाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री भाई जगताप, अनिकेत तटकरे (Aniket Tatkare),
महादेव जानकर (Mahadev Jankar), सतेज पाटील (Former Minster Satej Patil)
यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

Web Title :- Accident On Old Mumbai-Pune Highway | Strict measures to
reduce accidents on the old Mumbai-Pune National Highway, enforce traffic
discipline – Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court – Aurangabad | सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबादच्या ‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतरणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली

MNS Chief Raj Thackeray | सांगली-माहीमच्या कारवाईनंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘हे अतिक्रमण नाही तर…’

Maharashtra Industries Minister Uday Samant On Cidco Land | सिडकोने भाडेपट्ट्याने वाटप केलेल्या जमिनीसंदर्भात 30 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करावा – मंत्री उदय सामंत

Maharashtra Industries Minister Uday Samant On Cidco Land | सिडकोने भाडेपट्ट्याने वाटप केलेल्या जमिनीसंदर्भात 30 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करावा – मंत्री उदय सामंत

Congress Leader Rahul Gandhi | खासदारकी रद्द झाल्यावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘कोणतीही किंमत चुकवण्याची तयारी’

Maharashtra Chief Minister Eknath Shinde | प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन उपाययोजना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे