इंदापूर : कंटेनरने मोटार सायकलला धडक दिल्याने अडीच वर्षाच्या चिमुकलीचा मृृत्यु, वडिल जखमी

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – कंटेनर चालकाने बेजबाबदार पणाने विरूद्ध दिशेने कंटेनर चालवुन दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील अडीच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृृत्यु झाला. तर चिमुकलीचे वडील जखमी झाल्याची घटना इंदापूर तालुक्यातील वरकुटे पाटी येथे, पूणे-सोलापूर हायवे रोडवर आज सकाळी 8:30 वाजता घडली. घटना घडल्यानंतर कंटेनर चालक फरार झाला असुन याबाबतची फिर्याद अपघातात जखमीचा मेव्हुणा राम अंकुश घोडे (सध्या रा. वरकुटे बु., भुजबळवस्ती) यांनी इंदापूर पोलीसात दीली आहे.

याबाबतची सविस्तर हकीकत अशी की, अपघातात जखमी झालेले शिवाजी आत्माराम गायकवाड (मुळ गाव नाणशी ता.मंठा, जि. जालना, सध्या रा. वरकुटे बु. भुजबळ वस्ती, ता.इंदापूर,जि. पूणे) हे त्यांच्या अडीच वर्षाची मुलगी श्रद्धाला दुचाकीवर (एम.एच.42, व्ही.4190) पुढील बाजुस बसवुन त्यांच्या बाजुने जात होते. ते वरकुटे पाटी येथे 100 मिटर अंतरावर असणार्‍या हायवे रोडवरील लेनवर आले असता त्यांच्या विरूद्ध दिशेने कंटेनर (एच.आर.38, व्ही.7408) हा सरळ अंगावर आला व त्याने दुचाकीला धडक दीली. यामध्ये दुचाकीवर पुढील बाजुस बसलेली श्रद्धा खाली पडून गंभिर जखमी झाल्याने तीचा दुर्दैवी मृृत्यु झाला. तर तीचे वडील हे जखमी झाले आहेत.

कंटेनर चालक याने अविचाराने व हयगय करून विरूद्ध दिशेने वाहन चालवुन अपघातास कारणीभुत ठरला असुन अपघात घडल्यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत न करता कंटेनर जागेवर सोडून तो पळुन गेला असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद जखमी शिवाजी गायकवाड यांचे मेव्हुणे राम घोडे यांनी इंदापूर पोलीसात दीली असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक लोंढे हे करत आहेत.

अपघात घडल्याच्या ठीकाणी कंटेनर चालक पळून गेल्याने व जखमींना तात्काळ मदत न मिळाल्याने स्थानिक नागरीकांनी संताप व्यक्त करत पूणे-सोलापूर हायवे रोडवरच रस्ता रोको करून आंदोलन केले.
यावेळी पोलीस पथक अपघात स्थळी दाखल झाल्यानंतर पोलीसांच्या मदतीने संतप्त ग्रामस्थांची समजुत काढुन रस्ता सुरळीत करण्यात आला व रास्ता रोको आंदोलन स्थगीत करण्यात आले.

Visit : Policenama.com