कोट्यावधीच्या संपत्तीचे मालक असूनही अतिशय साधं आयुष्य जगतात अभिनेते नाना पाटेकर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 साली महाराष्ट्रातील मुरूड-जंजीरा इथं झाला आहे. आजवर नानांनी अनेक हिट सिनेमात काम केलं आहे. अनेक पुरस्कारही मिळवले आहेत. आज आपण कोट्यवधी संपत्तीचा मालक किती साधं आयुष्य जगतो याबद्दल जाणून घेणार आहोत.

नानांची संपत्ती

नाना पाटेकर गेल्या 4 दशकांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. सिनेमातूनच ते बक्कळ कमाई करतात. नानांची एकूण 40 कोटींची संपत्ती आहे. मराठी, हिंदीसह त्यांनी आसामी सिनेमातही काम केलं आहे. इतकंच नाही तर अनेक जाहिरातीतही ते काम करताना दिसतात. इतर कलाकारांच्या तुलनेत नानांची संपत्ती कमी आहे. कराण यातील काही हिस्सा ते समाजहितासाठीही वापरतात.

नाना शेतकऱ्यांनाही कायमच मदत करत असतात. त्यांच्या नेट वर्थपैकी 90 टक्के त्यांनी लोकहितासाठी दान केलं आहे. आजवर ते अनेकाद उघडपण लोकांनी मदत करताना दिसले आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बाजूनंही ते कायमच उभे असतात.

नानांच्या गाड्यांबद्ल बोलायचं झालं तर त्यांच्याकडे रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 बाईक आहे. याची किंमत 1.4 लाख आहे. याशिवाय महिंद्रा स्कॉरपिओ (9.3 लाख) आहे. त्यांच्याकडे एकमेव लक्झरी कार ऑडी क्यु 7 आहे. याची किंमत 81 लाख आहे.

नानांच्या लाईफस्टाईलबद्दल बोलायचं झालं तर ते खूप साधे राहतात. आईसह ते एका 1 बीएचकेमध्ये राहतात. याशिवाय त्यांचं पुण्यात फार्म हाऊसही आहे.

नानांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 1978 साली आलेल्या गमन या सिनेमातून त्यांनी डेब्यू केला होता. 1988 साली आलेल्या सलाम बॉम्बे या सिनेमानं त्यांना ओळख मिळाली. यानंतर त्यांनी 1989 साली परिंदा सिनेमात काम केलं. यासाठी त्यांनी बेस्ट सपोर्टींग अॅक्टरचा नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. गेल्या 4 दशकात नानांनी मराठी, हिंदी, आसामी अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. आजवर त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.