‘अजितदादा मी सदैव आपला आभारी राहीन’ : रितेश देशमुख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील इस्टर्न फ्री वे ला काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचं नाव देण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर विलासरावांचा चिरंजीव आणि बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. मी सदैव आपला आभारी राहीन असं त्याने म्हटलं आहे. रितेशने याबाबत ट्विट केलं आहे.

मुंबईतील इस्टर्न फ्री वेला विलासराव देशमुखांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. अजित पवारांनी नगरविकास विभागाला याबाबत सूचनाही दिल्या आहेत. यानंतर रितेशने ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये रितेश म्हणतो, “विलासराव देशमुखांनी केलेल्या कामाला आज तुम्ही मान दिला. त्याबद्दल मुलगा म्हणून मी सदैव आपला आभारी राहीन दादा.” यावेळी रितेशने अजित पवारांचं ट्विटही रिट्विट केलं आहे.

अजित पवारांनी राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आणि महसूलवाढीसंदर्भात परिवहन विभागाची बैठक घेतली. यानंतर राज्याच्या परिवहन विभागाला सुधारणांसदर्भात सूचनाही त्यांनी दिल्या. अजित पवारांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. याशिवाय याच वेळी त्यांनी मुंबईतील इस्टर्न वे ला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव देण्याबाबत घोषणाही केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like