‘डोंगराळ’ परिसर ‘अनवाणी’ चालत तिरूपती दर्शनासाठी पोहचली जान्हवी कपूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री जाह्नवी कपूर ही तिच्या संस्कृतीशीही नेहमीच जोडलेली आहे. जाह्नवी कपूर सोमवारी सकाळी व्हीआयपी ब्रेक दरम्यान आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिरात गेली होती.

महत्वाची गोष्ट म्हणजे जाह्नवी कपूर सुमारे 12 किलोमीटर डोंगराच्या पायरावर चढून तिरुपती मंदिरात पोहोचली. जाह्नवी कपूरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये जाह्नवी मंदिरात पोहोचताना ती मध्यभागी विश्रांती घेताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B8Ws6bMBdaN/

फोटोमध्ये जाह्नवीने पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या फोटोमध्ये जाह्नवी कपूर तिच्या मित्राबरोबर सोफ्यावर विश्रांती घेताना दिसत आहे.

जाह्नवीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर सध्या तिच्याकडे बरेच चित्रपट आहेत. जाह्नवी लवकरच ‘गुंजन सक्सेना’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात जाह्नवी फायटर पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाचे अनेक पोस्टर्स जाहीर झाले असून या भूमिकेत जाह्नवी खूपच अप्रतिम दिसत आहे.

याशिवाय जाह्नवीही राजकुमार रावमध्ये ‘रुही अफजा’मध्ये देखील दिसणार आहे. करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘तख्त’मध्येही जाह्नवी महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचबोरबर जाह्नवी या चित्रपटांव्यतिरिक्त कार्तिक आर्यनबरोबर ‘दोस्ताना’च्या सीक्वलमध्ये काम करत आहे.