अभिनेत्री कंगनाची बहिण रंगोली म्हणाली – ‘यांना गोळी घालायला हवी’ ! आता ट्विटर अकाऊंट ‘Suspended’

पोलिसनामा ऑनलाइन –देशातील डॉक्टर आणि पोलिसांवर हल्ल्याच्या अनेक घटना समोर येताना दिसत आहेत. यावरून अनेक सेलिब्रिटींनी आपली नाराजगी व्यक्त केली आहे. यात यादीत आता अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोली चंदेलचंही नाव समाविष्ट झालं आहे. रंगोलीनं अशा लोकांना गोळी घातली पाहिजे असं म्हटलं आहे. फक्त डॉक्टर आणि पोलिसांवार हल्ला करणारेच नाही तर तिनं जमातींवरही निशाणा साधला आहे.

रंगोली चंदेलनं एक ट्विट केलं आहे. यात ती म्हणते, “एक जमाती कोरोना व्हायरसमुळं मेला. जेव्हा पोलीस आणि आणि डॉक्टर त्यांना तपासायला गेले तेव्हा ते यांच्यावर हल्ला करतात त्यांना मारतात. सेक्युलर मीडिया आणि मुल्लांना एक लायनीत उभं करून गोळी घालायला हवी. आपण इतिहासाची पर्वा नाही करायला पाहिजे. आयुष्य फेक इमेजपेक्षा जास्त किमती आहे.”

रंगोलीच्या या ट्विटनंतर मात्र अनेकांनी तिला ट्रोल केलं. ती चुकीचं बोलत आहे असं काहींनी म्हटलं. यानंतर तिला आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी आणखी एक ट्विट करावं लागलं.

आपल्या आणखी एका ट्विटमध्ये रंगोली म्हणते, “आपलं संविधान सांगतं की, दहशतवादाला धर्म नसतो. मग असं का म्हणत आहात की, मी एका धर्माच्या लोकांना गोळी घालायला सांगत आहे. मी तर स्पष्ट सांगत आहे की, डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर सरकार NSA लागू करत आहे याचा अर्थ ते आतंकवादी झाले. मग एवढी मिर्ची का लागली.

या सगळ्यानंतर ट्विटर रूल्स व्हायोलेट केल्याबद्दल रंगोलीचं अकाऊंटही सस्पेंड करण्यात आलं.