आदित्य ठाकरेंना काकांचा ‘मनसे’ पाठिंबा !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्याच्या विधानसभा निवडणुकांची तयारी जोरात सुरु असून जवळपास सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यामुळे आता खरी रंगत निर्माण झाली असून अनेकांनी बंडखोरी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच महायुतीने देखील आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच कुणीतरी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून वरळी विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणर आहेत.

आज आदित्य ठाकरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यांच्याविरोधात आघाडी उमेदवार देणार असून राज ठाकरे यांनी मात्र अजूनपर्यंत या मतदारसंघात आपला उमेदवार दिलेला नाही. त्यामुळं राज ठाकरे अप्रत्यक्षपणे मदत करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगात आहे. काल मनसेने आपली दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र यामध्ये वरळी विधानसभेमध्ये अजूनपर्यंत उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही.

मनसेने आधी 27 उमेदवारांची यादी जाहीर केली असून काल 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र आता आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार न दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरे घराण्यातून पहिला व्यक्ती निवडणूक लढवत असताना राज ठाकरे मदत करत असल्याचे एकंदर यावरून दिसून येत आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे या मतदारसंघात काय करिष्मा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, याआधी देखील ठाकरे कुटुंबीयांमध्ये कितीही मतभेद असले तरी ते नेहमी एकमेकांच्या मागे उभे राहिले आहेत. उद्धव आणि राज देखील नेहमी एकमेकांच्या मागे उभे राहिले आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या यादीत ते वरळीतून उमेदवार देतात कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या