डिस्चार्जनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी कामाला केली सुरूवात, कॅबिनेटच्या बैठकीला लावली हजेरी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    कोरोनाला हरविल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या कामाला सुरूवात केली. त्यांनी कॅबिनेटच्या बैठकीत सहभाग घेतला. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी कॅबिनेट बैठकीतील छायाचित्रे देखील नागरिकांसोबत शेअर केली आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती, त्यानंतर त्यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सोमवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर ते कॅबिनेटच्या बैठकीत सहभागी झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॅबिनेट बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. यात दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहली.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी ट्विट केलंय की, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झालो आहे. या दरम्यान माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहली.

सोमवारी अमित शहा यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयतून डिस्चार्ज मिळाला आहे. अमित शहा यांना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांना ताप होता, त्यात त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात दाखल केले होते.

2 ऑगस्ट रोजी केंद्रीय मीं अमित शहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात भर्ती केले होते. अमित शहा यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर सर्वांनी त्यांची प्रकृती लवकर सुधारावी, यासाठी प्रार्थना केली होती. त्यानंतर 12 दिवसांनी म्हणजे 14 ऑगस्ट 2020 रोजी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.