सुशांतच्या आत्महत्येनंतर जिया खानच्या आईचे ‘भाईजान’ सलमानवर गंभीर आरोप ! शेअर केला व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर आता घराणेशाहीचा मुद्दा चांगलाच तापताना दिसत आहे. यानंतर आता अनेकजण आवाज उठवताना दिसत आहेत. दिवंगत अ‍ॅक्ट्रेस जिया खानची आई राबिया अमीन हिनं सुपरस्टार सलमान खानवर अनेक गंभीर आरोप करत लंडनमधून एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर चर्चेत असून झपाट्यानं व्हायरल होत आहे.

समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, जियाची आई, राबिया अमीन म्हणते, “माझ्या संवेदना सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबासोबत आहे. हे खूप भयानक आहे. हा मजाक नाही. आता बॉलिवूडनं बदलायला हवं. असं वागणं बंद व्हायला हवं. एखाद्याची खेचणंही हत्या करण्यासारखं आहे.”

राबिया पुढे म्हणते, “या सगळ्यानं मला 2015 ची आठवण येत आहे. माझ्या मुलीच्या केसच्या वेळी मी एका सीबीआय ऑफिसरला भेटले तर त्यांनी सांगितलं की, सलमान खानचा फोन आला. ते रोज फोन करतात. पैशांचं बोलतात. म्हणतात की, मुलाची चौकशी करू नका. आम्ही काय करू शकतो.” राबियानं हे प्रकर उच्च अधिकाऱ्यांपर्यंतही नेलं. तिचं म्हणणं आहे ह सगळं थांबायला हवं.