धक्कादायक ! वजन कमी करण्याच्या गोळ्या घेतल्या तिनं, ठाण्यात युवतीचा मृत्यू

ठाणे, पोलीसनामा ऑनलाईन : ठाण्यात एका तरुणीने वजन कमी करण्याच्या गोळ्या घेतल्या आणि काही तासानेच तिचा मृत्यू झाला. या मुलीचे नाव मेघना देवगडकर (२२) असे असून ती पेशाने नृत्यांगना होती. ती जीममध्ये ट्रेनर म्हणून काम करत होत. वजन कमी करण्याच्या ज्या गोळया घेण्यावर बंदी होती, नेमक्या त्याच गोळया मेघनाने घेतल्या त्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त समोर आले आहे.

या मुलीनं जिममध्ये वर्कआउटला जाण्याआधी गोळ्या घेतल्या होत्या. नुकतीच ती या जिममध्ये ट्रेनर म्हणून रुजू झाली होती. तिने जेव्हा गोळ्या घेतल्या तेव्हा वेळाने तिला उलट्यांचा त्रास होऊ लागला. तिला घरानजीकच्या दवाखान्यात नेत्यात आले. त्यानंतर तिला लाईफलाईन हॉस्पिटल आणि नंतर सायन रुग्णालयात हलवण्यात आले. खूप प्रयत्न केले परंतु यश आले नाही, शेवटी मेघनाचा कार्डीअक अरेस्टने मृत्यू झाला. गोळ्या घेतल्यानंतर पंधरा तासांच्या आतच तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

वजन कमी करण्याचा या गोळ्या घेण्यासाठी बंदी घातली होती. मात्र मेघना ने या गोळ्या घेतल्या आणि मेघनाला हायपरथरमियाचा त्रास सुरु झाला. अचानक तिच्या शरीरातील तापमान सामान्यपेक्षा अधिक झाले, त्यामुळे रक्तदाब आणि ह्दयाचे ठोके वाढले असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे कार्डीअक अरेस्टने तिचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणाची नौपाडा पोलीस ठाण्यात अपघात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. एफडीएला देखील अहवाल पाठवण्यात आला असून मेघनाच्या हाती या गोळ्या कशा आल्या याचा तपास पोलीस घेत आहेत.