मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर ‘खातेवाटप’ आजच, ‘गृहमंत्री’ पदाबाबत ‘सस्पेन्स’ कायम !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – राज्य सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. शपथ घेणाऱ्या 35 मंत्र्यांची नावे राजभवनाकडे पाठवण्यात आली आहेत. आज शपथ विधी होणार हे निश्चित असले तरी खातेवाटप कमी होणार याबाबत संभ्रम होता. असले तरी शिवसेनाचे मुखपत्र असलेल्या सामनाचे वृत्त आहे की शपथ विधी बरोबरच खातेवाटप देखील आज होणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील म्हणाले की सध्या 6 मंत्र्यांकडे सोपावण्यात आलेली खाती तात्पुरत्या स्वरुपाची आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप देखील करण्यात येईल. सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री घेतील. असे असले तरी गृहमंत्री पद कोणाकडे जाईल हे मंत्रिमंडळ विस्तारानंतर कळेल असे सांगत त्यांनी गृहमंत्री पदाबाबत सस्पेंस ठेवला.

या मंत्रिमंडळ विस्तारात आज शिवसेनेच्या वाट्याला 13, राष्ट्रवादीच्या वाट्याला 13 तर काँग्रेसच्या वाट्याला 10 अशी मंत्रिपद येण्याची शक्यता आहे. तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार असे निश्चित असल्याचे बोलले जात आहे. परंतु इतर खातेवाटपात कोणाकडे कोणतं मंत्रिपद जाणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/